◆ जे एस डब्ल्यू उम्मीद शिष्यवृत्ती (इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी) ◆

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ १२०००

◆ शेवटची तारीख:- १७/०९/२०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
जेएसडब्लू उम्मीद शिष्यवृत्ती उपक्रम हा जेएसडब्लू फाउंडेशन तर्फे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना कोविड-१९च्या संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण घेता येणार नाही. या महासाथीच्या गर्तेत जवळपास १.५ दशलक्ष शाळा बंद राहिल्या यामुळे २४७ दशलक्ष प्राथमिक तसेच माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. या विद्यार्थ्यांचा प्रवास दुर्दैवाने बालमजुरी आणि असुरक्षित स्थलांतरात होऊ शकतो. अशाच विद्यार्थ्यांना जेएसडब्लू उम्मीद शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण विनाअडथळा घेण्यास मदत होईल.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: प्राथमिक आणि माध्यमिक
१) अभ्यासक्रमाचे नाव: अकरावी

◆ पात्रता निकष:-
१) अकरावीत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान ३५% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, सालेम, कलमेश्वर, वासिंद, मुंबई, बारमेर, पालघर, ओडिशा भागातील जेएसडब्लूच्या प्लांट शेजारी राहतात असे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
३) शिष्यवृत्ती फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे
४) ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोव्हिड साथीत

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) अर्जदाराचा फोटो
२) ओळखीचा पुरावा
३) पत्त्याचा पुरावा
४) पालक मृत्यू प्रमाणपत्र
५) विद्यार्थी बँक पासबुक
६) चालू वर्षाची फी पावती/फी रचना
७) शाळा/महाविद्यालय प्राधिकरणाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र विद्यार्थ्याला इतर कोविड शिष्यवृत्ती मिळत नसल्याची पुष्टी करणारे.
८) मागील वर्षीचे मार्कशीट
९) अधिवास प्रमाणपत्र

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/68/407_11.html

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *