इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप

◆ शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२३

◆ फेलोशिपची रक्कम:
१) प्रति महिना रु.१,२५,०००/- ( एक लाख पंचवीस हजार रुपये )
२) 5 वर्षांसाठी दरवर्षी रु.७ लाख रुपये संशोधन अनुदान (रिसर्च ग्रॅन्ट)

◆ फेलोशिप बद्दल:
इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप पीएचडी पूर्ण केलेल्या आणि अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी आणि पशुवैद्यकीय विज्ञान या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान क्षेत्रात पोस्ट-डॉक्टरेट संशोधन करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येते. ही फेलोशिप पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप आहे जी विद्यार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाते.

◆ पात्रता:
i) पात्रता निकष :
➢ भारतीय नागरिक आणि पीआयओ दर्जा असलेले भारतीय वंशाचे लोक ज्यांनी जगातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातुन विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, फार्मसी, औषध आणि कृषी संबंधित कोणत्याही विषयांमध्ये पीएच.डी. पदवी मिळवली आहे असे विद्यार्थी शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्यास पात्र आहेत.
➢ उमेदवारांनी इयत्ता १२वी पासून पीएचडी पर्यंत सर्व परीक्षांत ६०% (किंवा समतुल्य CGPA) गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
➢ ज्या विद्यार्थ्यांनी पीएच.डी थिसीस सबमिट केले आहे, परंतु ज्यांचा निकाल आलेला नाही असे विद्यार्थी सुद्धा फेलोशिप करीत अर्ज करण्यास पात्र आहेत.
➢ उमेदवाराने उत्कृष्ठ संशोधन क्षमता दर्शविणाऱ्या उच्च प्रतिष्ठित जर्नल्समध्ये त्यांचे रिसर्च वर्क पब्लिश केले असणे आवश्यक आहे.
➢ जे उमेदवार भारतामध्ये नियमित/कंत्राटीच्या पदांवर कार्यरत आहेत ते त्यांच्या कारकीर्दीत सुधारणा आणि वाढीसाठी इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिपसाठी देखील अर्ज करू शकतात. परंतु, फेलोशिपकरिता निवड झाल्यावर उमेदवारांना राजीनामा द्यावा लागेल.
➢ इयत्ता 12वीच्या परीक्षेत बोर्डामध्ये पहिल्या 1% च्या आत असलेले, IIT-JEE रँक धारक, पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील विद्यापीठ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक धारक विद्यार्थी फक्त फेलोशिपकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ वयोमर्यादा :- 1 जानेवारी 2022 रोजी वय

  • जनरल प्रवर्गातील उमेदवार २७ ते ३२ वर्षे
  • SC/ST/महिला उमेदवार २७ ते ३७ वर्षे
  • अपंग उमेदवार २७ ते ४२ वर्षे

◆ आवश्यक कागदपत्रे :-
1) पासपोर्ट आकाराचा फोटो
२) दहावीची गुणपत्रिका किंवा बोर्ड प्रमाणपत्र
3) शैक्षणिक पात्रतेच्या गुणपत्रिका ( जसे की 12वी, ग्रॅजुएशन आणि पोस्ट ग्रॅजुएशन )
4) पीएच.डी. पदवी प्रमाणपत्र
५) समुदाय / जात प्रमाणपत्र (अर्जदार अनुसूचित जाती/जमातीचा असेल तरच)
6) अपंगत्वाचा पुरावा (केवळ बेंच मार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी)
७) नियुक्ती पत्र (नोकरी असल्यास)
8) व्यावसायिक प्रशिक्षण आणि संशोधन अनुभवाचे तपशील यांबद्दल २००० शब्दांत माहिती.
९) आतापर्यंत केलेल्या कामाचा तपशील आणि वैज्ञानिक योगदानाचे महत्त्व यांबद्दल १००० शब्दांत माहिती.
10) तीन श्रेणींमधील प्रकाशनांची यादी उदा. प्रकाशित, प्रकाशनासाठी स्वीकारले आणि सबमिट केले.
11) संशोधनाचे प्रस्तावित क्षेत्र आणि प्रस्तावाची संक्षिप्त रूपरेषा यांबद्दल २५०० शब्दांत माहिती

◆ फेलोशिप जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://online-inspire.gov.in/Account/OpenDocument?documentId=9ryqi2f8nTXWOAP%2BtQrybw%3D%3D

◆ फेलोशिप मार्गदर्शक तत्त्वे आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://online-inspire.gov.in/Content/GuideLine/FacultyFellowshipGuidelines.pdf

◆ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.online-inspire.gov.in/

◆ जॉइनिंग रिपोर्ट फॉरमॅट डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:-
https://online-inspire.gov.in/Content/GuideLine/TemplateforJoiningReport2021.pdf

◆ फेलोशिप अंडरटेकिंग डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :-
https://online-inspire.gov.in/Content/GuideLine/UNDERTAKINGFacultyFellow2022.pdf

◆ फेलोशिपच्या अटी आणि नियम डाउनलोड करण्यासाठी :-
https://online-inspire.gov.in/Content/GuideLine/UndertakingbyHostInstitute.pdf

◆ फेलोशिपचे FAQ डाउनलोड करण्यासाठी :-
https://online-inspire.gov.in/Content/FAQsFacultyfellowship.pdf

◆ संपर्काची माहिती:
ईमेल:- inspire.prog-dst@nic.in
संपर्क :
०१२४-६६९००२०
०१२४- ६६९००२१