हंसा अग्रवाल फॅशन शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती बद्दल:-
हंसा अग्रवाल फॅशन शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती जे विद्यार्थी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येतात आणि फॅशन डिझायनर बनू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना दिली जाते. थिंक शार्प फाउंडेशनने व्रजेश नॅचरल फायबर अँड फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम :- रु ५०,०००/-

पात्रता:-
१) फॅशन डिझाईन कोर्समधील डिप्लोमा/पदवी (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) मध्ये शिकत असलेले किंवा शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करू शकतात.

२) केवळ सात लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत

ऑनलाइन अर्जासाठी लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfL36w8YS4S-lcLWLbyPO31iuxTYkJtdJVPrOUGk6uz5JIU9A/viewform

संपर्क माहिती:-
मोबाईल : 8530275511 / 9892742011
ईमेल: info@thinksharpfoundation.org