चीफ मिनिस्टर फेलोशिप २०२३

◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-
दर महिन्याला 70 हजार रुपये फेलिशिप आणि पाच हजार रुपये प्रवास भत्ता असे एकूण 75 हजार रुपये दिले जातील.
फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.
फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.
फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.
आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.
१२ महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

◆ शेवटची तारीख:-
२ मार्च २०२३

◆ फेलोशिप बद्दल:-
महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी चीफ मिनिस्टर फेलोशिप दिली जाणार आहे. कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण करून कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. या फेलोशिप करिता 75 हजार रुपये दर महिन्याला फेलोशिप मिळणार आहे. यावर्षी करता साठ उमेदवारांची निवड चीफ मिनिस्टर फेलोशीपकरता करण्यात येणार आहे. शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जा हा फेलोशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाईल.

◆ मुख्यमंत्री फेलोशिपचा कालावधी :-
12 महिने

◆ पात्र अभ्यासक्रम:-
कोणत्याही विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या फेलोशिपकरीता अर्ज करू शकतात.

◆ पात्रता निकष:-
१) कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये पदवी परीक्षा कमीत कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेल्या भारतातील कोणताही विद्यार्थी या फेलोशिपकरिता अर्ज करण्यास पात्र आहे.
२) चीफ मिनिस्टर फेलोशिपकरिता अर्ज करण्याकरिता कमीत कमी एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशीप / अप्रेंटिसशिप / आर्टिकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पूर्ण वेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
३) जे विद्यार्थी फेलोशिप करता अर्ज करणार आहेत त्यांना मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक आहे.
४) फेलोशिप करता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे आहे, फक्त असेच उमेदवार फेलोशिप करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ फेलोशीपकरिता अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाइन

◆ फेलोशीप अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क :- रुपये ५००/-

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) १० वी, १२ वी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादींच्या गुणपत्रिका
२) अनुभवाची प्रमाणपत्रे
३) छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत
४) पत्त्याचा पुरावा

◆ महत्त्वाच्या तारखा :-
अर्जाचा करण्याचा कालावधी- ७ फेब्रुवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३
मॉक परीक्षा – ३ मार्च, २०२३ ते ५ मार्च, २०२३
ऑनलाईन परीक्षा – ४ आणि ५ मार्च २०२३

◆ फेलोशिपकरिता निवडीची प्रक्रिया :-
१) ऑनलाइन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
२) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा
३) वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांना विशिष्ट कालावधीत दिलेल्या 3 विषयांवरील निबंध ऑनलाईन सादर करावे लागतील.
४) मुलाखत—इंटरव्ह्यू- वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

◆ IMPORTANT NOTE:-
1) मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक अर्हतेसोबत उमेदवाराची सामाजिक व सार्वजनिक कामासंबंधात बांधिलकी, सशक्त चारित्र्य, सकारात्मक दृष्टिकोन, संघ भावनेने काम करण्याची वृती, संबंधित कामाचा अनुभव, सदर कार्यक्रमासाठी त्याची योग्यता या आणि इतर बाबी विचारात घेतल्या जातील.
2) फेलोशिपकरिता उमेदवारांची अंतिम निवड करताना वस्तुनिष्ठ चाचणी, निबंध व मुलाखत यासाठी अनुक्रमे १५, ३० व ५० असे गुण राहतील. मान्यताप्राप्त संस्थेची पदव्युत्तर पदवी वा व्यावसायिक पदवीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारावर ५ गुण राहतील.
3) फेलोशिपकरिता उमेदवारांची अंतिम निवड करताना दोन उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास महाराष्ट्राचा अधिवासी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.

◆अधिक माहितीसाठी लिंक:-
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/aboutprogrammr.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://cmfp2023.mkcl.org/#/registration

◆ फेलोशिपकरिता नियम व अटी:-
१) यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत.
२) फेलोच्या नियुक्तीनंतर अ) पोलीस पडताळणी अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत रुजू झाल्यावर करण्यात येईल. ब) नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र रुजू होताना सादर करणे बंधनकारक राहील. क) फेलोंची शैक्षणिक अर्हता, इ. च्या सत्यतेबद्दल कागदपत्राची तपासणी (मुलाखतीच्या वेळी इत्यादी बाबी अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत करण्यात येतील.
३) या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला १२ महिन्यांच्या कराराने फेलोशिप देऊन नियुक्ती करण्यात येईल. सदर १२ महिन्यांच्या कालावधीत शैक्षणिक कार्यक्रमाचा कालावधी तसेच फेलोशिपकार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमाचा कालावधी अंतर्भूत धरण्यात येईल. कराराच्या कालावधीत मानधनामध्ये कोणतीही वाढ मिळणार नाही.
४) निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर, निर्देशित केलेल्या ठिकाणी व विहीत मुदतीत उमेदवारास स्वखर्चाने हजर व्हावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत यात सवलत दिली जाणार नाही. निर्देशित ठिकाणी व य विहीत मुदतीत हजर न राहणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाईल. या संदर्भात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने घेतलेला निर्णय अंतिम राहील.
५) उमेदवारांकडून विभाग / कार्यालय / प्राधिकरण बाबत पसंतीक्रम विचारणा करण्यात आली तरी. शासनाच्या प्राथमिकता तसेच उमेदवाराची योग्यता व उपयुक्तता विचारात घेऊन उमेदवारास विभाग /कार्यालय / प्राधिकरण नेमून दिले जाईल, याबाबत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांचा निर्णय अंतिम राहील. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड झाल्यानंतरही नियुक्ती न देण्याचा व निवड प्रक्रियेतून बाद ठरविण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना राहील.
६) फेलोंना फेलोशिपच्या कालावधीत तात्पुरते ओळखपत्र व तात्पुरता अधिकृत शासकीय ई-मेल आयडी देण्यात येईल. संबंधित फेलोचा कार्यकाळ संपताच फेलोकडे असणारे ओळखपत्र संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना परत करणे आवश्यक राहील. तसेच फेलोला देण्यात आलेल्या ई-मेल आयडीची सुविधा बंद करण्यात येईल.
७) या फेलोशिप करिता फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.
८) फेलोंना महागाई भत्ता, अंतरिम किंवा वेतन आयोगाचे सेवा विषयक लाभ मिळणार नाहीत.
९) फेलोंना करार कालावधीत वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नाही.
१०) करार कालावधीतील सेवा ही निवृत्तीवेतन, बोनस, रजा प्रवास सवलत, रजा रोखीकरण किंवा अन्य कोणत्याही आर्थिक लाभासाठी व सेवा विषयक लाभांसाठी विचारात घेतली जाणार नाही.
११) व्यवसाय कराची वसुली फेलोच्या मानधनातून करण्यात येणार नाही.
१२) फेलोचा समूह वैयक्तिक अपघात विमा जोखीम या योजनेंतर्गत विमा उतरविण्याबाबत वित्त विभागाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
१३) सम संवर्गातील अधिकारी जी कर्तव्ये बजावतात, ती कर्तव्ये फेलोंची राहतील. त्यानुसार फेलो कार्यालयातील सर्व नियमांचे पालन करून निर्धारीत वेळेनुसार कार्यालयात उपस्थित राहून कर्तव्य पार पाडतील. तसेच, या कालावधीत फेलो पूर्णवेळ अभ्यासक्रम, खाजगी व्यवसाय व अर्ध/ पूर्ण वेळ नोकरी करु शकणार नाहीत. कार्यालयीन कामकाजाच्या दिवसा व्यतिरिक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जर कार्यालयीन कामकाजासाठी कर्तव्य बजावावे लागले, तर त्यासाठी फेलोंना कामावर हजर राहावे लागेल. त्याकरिता कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त मानधन मिळणार नाही.
१४) कराराच्या १२ महिन्यांच्या कालावधीत फेलोंना ८ दिवसांची किरकोळ रजा मिळेल. अन्य कोणत्याही प्रकारची रजा त्यांनी उपभोगल्यास त्यानुसार मानधनातून कपात करण्यात येईल.
१५) फेलोंनी मुख्यालयात उपस्थित राहाणे आवश्यक असून, संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
१६) फेलोंचा कालावधी बारा महिन्यांचाच असेल फेलोंची निवड बारा महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर आपोआप संपुष्टात येईल. फेलोंची निवड ही फक्त तात्पुरत्या स्वरुपाची असेल, फेलोंना सरकारी नोकरीत समाविष्ट होण्याचा हक्क प्राप्त होणार नाही.
१७) करार कालावधीत फेलोचा मृत्यू झाल्यास वा अपंगत्व आल्यास, त्यांच्या कर्तव्य कालावधीतील छात्रवृती / विद्यावेतनाची रक्कम त्यांच्या घोषित कुटुंबियांना देण्यात येईल. परंतु, सानुग्रह अनुदान किंवा अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणार नाही.
१८) कराराच्या कालावधीत फेलोना राजीनामा द्यावयाचा असल्यास किमान एक महिना अगोदर स्वाक्षांकित अर्ज नियुक्ती केलेल्या कार्यालयामार्फत संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना सादर करावा लागेल. (१९) राजीनामा किंवा इतर कारणास्तव एखाद्या फेलोची फेलोशिप खंडित झाल्यास सदर फेलोस शैक्षणिक कार्यक्रमही पूर्ण करता येणार नाही.
२०) फेलोंनी केलेल्या कामगिरीबाबत कराराच्या कालावधीत तसेच कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतरही पूर्ण गुप्तता बाळगण्यात येईल. करार कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी / संशोधन / जमा केलेली माहिती / मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेले मुद्दे याबाबत कराराच्या कालावधीत किंवा त्यानंतरही त्यांना कोणतीही माहिती प्राधिकृत अधिकाऱ्याव्यतिरिक्त कोणासही देता येणार नाही.
२१) फेलोशिपच्या कालावधीत फेलो कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही. तसेच त्यांच्याकडून कोणतेही अशोभनीय कृत्य घडणार नाही, याची त्यांनी दक्षता घ्यावी, फेलोंनी सचोटी राखणे, निवडणुकीत भाग न घेणे वृत्तपत्रांना माहिती न देणे, कोणत्याही स्वरूपाची देणगी न घेणे इ. बाबत दक्षता घ्यावी.
२२) फेलोंना राज्यातील प्रकल्पांना / आस्थापनांना भेट देताना नियुक्ती केलेल्या कार्यालयाच्या प्रमुखाची पूर्वमंजुरी घ्यावी लागेल. यासंदभार्त ज्या प्रकल्पांना/ आस्थापनांना भेट द्यावयाची आहे, त्यांच्या प्रमुखाला त्याबाबतची पूर्वकल्पना द्यावी.
२३) फेलोशिपच्या संपूर्ण कालावधीत तसेच त्यानंतर फेलोंनी केलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारी बेकायदेशीर कृत्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईची जबाबदारी सर्वस्वी फेलोंवर राहील.

◆ फेलोशिप बद्दल माहिती जाणून घेण्याकरिता पुढील लिंक वर दिलेला व्हिडिओ पहा :-
https://www.youtube.com/watch?v=xfCxqI-WiZc

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, ८ वा मजला, वांद्रे (पू), मुंबई. ४०० ०५१
ईमेल- cmfellowship-mah@gov.in