छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) संस्थेकडून इयत्ता नववी दहावी आणि अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि nmms हि परीक्षा उत्तीर्ण केलेल्या परंतु शिष्यवृत्ती न मिळवू शकलेल्या विद्यार्थ्याना छत्रपती राजाराम महाराज सारथी हि शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:– शिक्षणासाठी आर्थिक मदत

◆ शेवटची तारीख:– ३० ऑगस्ट २०२३

◆ पात्रता निकष:-
१) NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या व इयत्ता ९ वीमध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणी लक्षित गटातील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणान्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यात्ता ९ वी मध्ये ५५० गुणासह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता १० वी मध्ये ६०% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करीत अर्ज करण्यास पात्र आहेत.
४) वार्षिक उत्पन्न-
इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यासाठी- विद्यार्थ्याच्या पालकाचे (आई वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावे
इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यासाठी & इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यासाठी – इयत्ता १० वी व ११ व मध्ये शिकत असलेलेया विद्यार्थ्यांच्या २०२२-२०२३ या सालातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार) पेक्षा कमी असावे.

Note- National Merit Cum Means Scholarship (NMMS) परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरीट लिस्टमध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यास पात्र नाहीत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठीच सारथी शिष्यवृत्ती योजना आहे.
विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व जूनियर कॉलेज मधील विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवरथेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी तसेच सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यास पात्र नाहीत.
काही एकत्रित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला हा आजोबा, काका, आजी, काकी व अन्य नातेवाईकांच्या नावाचा असतो. सदर दाखल्यावर संबंधित विद्यार्थ्याच्या नावाचा व नात्याचा उल्लेख असावा. केवळ अशा दाखल्या सोबत विद्यार्थ्यांनी एकत्रित कुटुंबातील शिधापत्रिका (रेशन कार्ड) सत्यप्रत अर्जासोबत जोडलेली असावी व इतर विद्यार्थ्यांनी शिधापत्रिका सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता नाही.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्याच्या आधार कार्डची सत्यप्रत.
२) विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक खाते असलेल्या पासबुकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत (नाव, खाते क्रमांक IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
३) मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र
४) विद्यार्थ्याच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन २०२२-२०२३ या सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत
५) NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक/निकालपत्रक
६) इयत्ता १०वी मार्कशीट – इयत्ता ११वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
७) इयत्ता ९वी मार्कशीट – इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

◆ अधिक माहितीसाठी लिंक:- (Click Here)
https://sarthi-maharashtragov.in/notices

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यासाठी- (Click Here)
इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यासाठी- (Click Here)
इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यासाठी – (Click Here)

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- मा. व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था, सारची, पुणे (महाराष्ट्र) ४११००४
ईमेल- sarthipune@gmail.com