★ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना (दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी)★

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ डिसेंबर २०२१

◆आवश्यक पात्रता:- 
१) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा/असावी.
२) या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण आवश्यक.
३)  पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण आवश्यक.
४) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.
५) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थत प्रवेश घेतलेला असावा.

◆शिष्यवृत्तीची रक्कम :- सदर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देण्यात येईल.

◆संपर्क क्रमांक:- १८०० १०३० २२२ (टोल फ्री)

◆अधिकृत संकेतस्थळ: – https://www.pmc.gov.in/en/educational-schemes

◆ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची लिंक:- dbt.punecorporation.org

Spread Scholarship Information

1 thought on “★ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना (दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी)★”

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!