◆अरविंद फॅशन्स लिमिटेड पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती◆

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹२०,०००

◆ शेवटची तारीख:- १९/१२/२०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओळखणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. अरविंद फॅशन्स लिमिटेड विद्यार्थ्यांना त्यांचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करेल.

◆ पात्रता निकष:-
1) पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि HSC, SSC, डिप्लोमा, पदवी आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान ७०% आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) शिष्यवृत्ती फक्त अशा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

◆ पात्र अभ्यासक्रम :-
अभ्यासक्रम स्तर: पदव्युत्तर पदवी
एमए, एमएससी, एमबीए, एमसीए, एमकॉम, एमटेक कोर्स.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

  1. ओळखीचा पुरावा
  2. पत्त्याचा पुरावा
    3.१०वी, १२वी किंवा डिप्लोमा मार्कशीट, पदवी मार्कशीट
  3. कॉलेज फीच्या पावत्या
  4. लेटेस्ट शैक्षणिक मार्कशीट (प्रथम वर्षाचे विद्यार्थी वगळता)
  5. विद्यार्थी बँक पासबुक/किओस्क
  6. बोनाफाईड प्रमाणपत्र
  7. उत्पन्न प्रमाणपत्र

◆ अधिक माहितीसाठी :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/239/460_3.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
संपर्क व्यक्ती- पियुष गंगवार
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

Spread Scholarship Information

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!