ACT फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:-
ही फेलोशिप एसीटी कॅपिटल फाउंडेशनने सुरू केली आहे. कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले आणि स्टार्टअप/गुंतवणूक/सल्लागार/सामाजिक क्षेत्रात दोन वर्षांचा कामाचा अनुभव असलेले या फेलोशिपसाठी पात्र आहेत. फेलोशिप दरम्यान, फेलोजना एड-टेक, सार्वजनिक आरोग्य सेवा, हवामान कृती किंवा लैंगिक समावेशकता क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. ज्या उमेदवारांना सोशल इम्पॅक्टमध्ये करिअर करायचे आहे किंवा सामाजिक उद्योजक बनायचे आहे त्यांच्यासाठी ही ACT फेलोशिप एक सुवर्ण संधी आहे. एसीटी फेलोशिप सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू होईल

◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-
रु. 60,000 प्रति महिना
एसीटी टीम तसेच उद्योग तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी आणि अनेक थेट प्रकल्पांवर काम करता येणार
एड-टेक, पब्लिक हेल्थकेअर, क्लायमेट ॲक्शन किंवा लिंग समावेशकता या क्षेत्रात काम करण्याची संधी

◆ शेवटची तारीख:- 7 ऑगस्ट 2023

◆ फेलोशिप कालावधी :- नऊ महिने

◆ पात्रता निकष:-
कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेले आणि स्टार्टअप/गुंतवणूक/सल्लागार/सामाजिक क्षेत्रात दोन वर्षांचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
1) ऑनलाइन अर्ज
2) वैयक्तिक/ऑनलाईन मुलाखत

◆ अधिक माहितीसाठी लिंक:- https://actgrants.in/act-fellowship-program/

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScy8BttPsQxS7FEywbZbPdyMCSbjRDQX3IAfZUeJ1njKeUpnQ/viewform

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- क्रमांक 8/2 (जुना क्रमांक 2 आणि जुना क्रमांक 7), उलसूर रोड, सिवन चेट्टी गार्डन्स, बेंगळुरू, कर्नाटक – 560042
ईमेल- core-pm@actgrants.in