सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती

sakal foundation scholarship

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
सकाळ इंडिया फाउंडेशनकडून परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते . ही शिष्यवृत्ती भारतात किंवा परदेशात पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठीही दिली जाते. हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर आणि भविष्यातील संभाव्य कमाई क्षमतेच्या आधारे दिली जाते. सकाळ इंडिया फाउंडेशनकडून कर्ज शिष्यवृत्तीवर कोणतेही व्याज घेतले जात नाही.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ₹ 1,00,000/- (एक लाख रुपये)

◆ पात्रता निकष:
परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमासाठी आणि भारतात किंवा परदेशात पीएचडी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले भारतीय विद्यार्थी सकाळ इंडिया फाऊंडेशन व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ पात्र अभ्यासक्रम:-

  • परदेशात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा
  • भारतात किंवा परदेशात पीएचडी.

◆ शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया:-

  1. ऑनलाइन अर्ज
  2. मुलाखत

◆ शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत:- ऑनलाइन

◆ आवश्यक कागदपत्रे:

  1. छायाचित्रांसह ऑनलाइन अर्ज.
  2. इयत्ता 10वी/12वी गुणपत्रिका आणि मागील शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि मार्कशीट्स.
  3. अभ्यासक्रमाच्या खर्चाचे विवरण.
  4. विद्यार्थी आणि पालक यांचे आधार आणि पॅन कार्ड.

◆ शिष्यवृत्तीचा कालावधी:- 2 वर्षे

◆ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://www.sakalindiafoundation.com

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी (खालील लिंकवर क्लिक करा):-
https://www.sakalindiafoundation.com/interest-free-education-loan-scholarship/

◆ संपर्क तपशील:
पत्ता- सकाळ ऑफिस बिल्डिंग, 595, बुधवार पेठ, पुणे 411002
फोन: 020 66035935
ईमेल: contactus@sakalindiafoundation.org