◆ फेलोशीप बेनिफिट: –
- १५,००० +( १००० प्रवास खर्च ) प्रती महिना
- ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी देखील काढली जाईल.
- फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर 50000 रुपये दिले जातील.
-विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून ते प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत पोहचण्याकरिताचे आणि परत घरी येण्याकरिताचे ३ टीअर AC ट्रेन तिकिटाचे किंमत तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी प्रवास करण्यासाठी झालेला खर्च दिला जाईल .
◆ फेलोशिप बद्दल :-
फेलोशिप हा १३ महिन्यांचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये दरवर्षी, निवडलेल्या शहरी तरुणांना संपूर्ण भारतातील ग्रामीण विकास प्रकल्पांवर काम करण्याची संधी दिली जाते.
◆ पात्रता निकष:-
१) फेलोशीप कार्यक्रम सुरू होण्याच्या दिवशी वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, म्हणजे उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९८९ पूर्वीचा नसावा आणि १ ऑक्टोबर २००० नंतरचा नसावा.
२) फेलोशीप कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केली असावी.
२) ओसीआय (Overseas Citizen Of India ) उमेदवारांना सूचनाः सध्या आपल्याकडे ओसीआय कार्ड नसल्यास ओसीआय नोंदणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्या. प्रक्रियेस कमीतकमी १-३ महिने लागतात, त्यामुळे आपण आपला फेलोशीप अर्ज सुरू करताच आपण ओसीआय कार्डकरिता अर्ज करा.
◆ अर्ज करण्याची प्रक्रिया: –
एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशीपची अर्ज आणि निवड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
स्टेज -१ (प्राथमिक अर्ज)
https://register.you4.in/ या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करणे.
स्टेज -२ (ऑनलाईन मूल्यांकन) पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर, निवडलेल्या अर्जदाराला ऑनलाइन मुल्यांकन स्टेजसाठी आमंत्रित केले जाईल.
स्टेज -३ (व्यक्तिमत्व मूल्यांकन आणि मुलाखत.)
स्टेज २ मध्ये सिलेक्ट केलेल्या उमेदवारांचे काही विशिष्ट पैलू समजून घेण्यासाठी, त्यांना व्यक्तिमत्व मूल्यांकन चाचणी देणे आवश्यक आहे. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना निवड मंडळाशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले जाईल. फेलोशीप प्रोग्रामला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी समविचारी तरुण, एसबीआय यूथ फॉर इंडिया टीम, आणि एसबीआय यूथ फॉर इंडिया माजी विद्यार्थी यांच्याशी जवळून संवाद साधण्यासाठी मुलाखत देखील घेतली जाईल.
◆ संपर्क तपशील:-
वेबसाइट- https://youthforindia.org/
ईमेल- applications@youthforindia.org
◆ अधिक प्रश्नांसाठी भेट द्या:-
https://sbiyouthforindia.freshdesk.com/support/home
◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://youthforindia.org/home