● अभ्यासवृत्ती मिळण्याची तारीख –
१ फेब्रुवारी २०२२
● अभ्यासवृत्ती विषयी :-
नामवंत संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ संपादक, मान्यताप्राप्त लेखक, दुर्मिळ ग्रंथांचे संग्राहक आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर यांचे १९ जानेवारी २०१६ रोजी आकस्मिक निधन झाले. डॉ.
टिकेकरांनीन सहा वर्षे (२००७-२०१३) एशियाटिक सोसायटी अध्यक्षपद सांभाळले. एशियाटिक
सोसायटीसारख्या ज्ञानसाधनेला महत्त्व देणाऱ्या संस्थेत तरुण संशोधकांनी यावे व तेथील
ज्ञानपरंपरा कायम राहावी, संशोधकांना उत्तेजन व प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी या काळात अनेक
नवनवीन प्रकल्पांची आखणी केली, व वेगवेगळे उपक्रम सुरू केले.
डॉ. टिकेकर यांच्या कार्याचे स्मरण म्हणून व त्यांचे कार्य पुढे चालावे यासाठी एशियाटिक सोसायटीने ‘डॉ.अरुण टिकेकर प्रगत अभ्यास केंद्रा’ची स्थापना केली आहे. या केंद्रातफे गेली पाच वर्षे
वेगवेगळ्या विषयांसाठी अभ्यासवृत्ती दिली गेली. सहावी ‘डॉ. टिकेकर अभ्यासवृत्ती’, त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत, एक फेब्रुवारी २०२२ रोजी दिली जाईल.
● संशोधनासाठी विषय आणि त्यांचे स्पष्टीकरण :-
यावर्षी साहित्य आणि कथनात्म साहित्य या संशोधन क्षेत्रातील, खालील विषय देण्यात येत आहेत.
१) भारतीय लेखकांनी १९९१ ते आजपर्यंतच्या काळात मराठी वा इंग्रजी भाषेत लिहिलेल्या सृजनशील कथनात्म साहित्यातून दिसणारी महानगरीय साहित्याची प्रतिबिंबे. (कथात्म साहित्यात कथा/कादंबरी/नाटक यांचा समावेश आहे.)
• विषय क्रमांक एकचे स्पष्टीकरण :- विसाव्या शतकाच्या मध्यापासून कला व साहित्य यात शहरी जीवनाची वर्णने अपरिहार्यपणे येऊ लागली. आधुनिकतेची ही चिन्हे होती. आजच्या समकालीन कथात्म साहित्यात हेच शहरी आणि आता महानगरीय जीवन विविध रूपात पार्श्वभूमीसारखे तर कधी प्रत्यक्ष एखादे पात्र म्हणून आपल्यापुढे येते. आज याचा विचार करणे अत्यावश्यक आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
२) भारतीय लेखकांनी १९९१ ते आजपर्यंतच्या काळात मराठी वा इंग्रजी भाषेत लिहिलेल्या सृजनशील कथनात्म साहित्यातून दिसणारे पुराणकथांचे नवीन अर्थनिर्णयन. (कथात्म साहित्यात कथा/कादंबरी/नाटक यांचा समावेश आहे.)
• विषय क्रमांक दोनचे स्पष्टीकरण :-
गेली तीन दशके भारतीय लेखक कथात्म साहित्यातून रामायण, महाभारत यातील पौराणिक कथांचा नवा व सर्जनशील अन्वय लावताना दिसतात. यात तत्त्वज्ञान, मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून मानसशास्त्रीय विश्लेषण करत लेखन होताना दिसते. पौराणिक व्यक्तिमत्त्वांचा विचार अशा दृष्टीकोनातून होतो. याशिवाय स्त्रीवादी दृष्टीकोनातून स्त्री व्यक्तीरेखांचेही चित्रण करत नवा अन्वयार्थ
लावला जात आहे.
● पात्रता
१) २५ ते ६५ वयोगटातील संशोधक, अभ्यासक व विद्यार्थी या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
★ महत्त्वाच्या सुचना :-
१) आपण आपले संशोधकीय प्रबंध मराठी व इंग्रजी अशा दोन्हीही भाषेत सादर करू शकता.
२) संशोधन निबंध सादर करण्याच्या कालावधी आणि त्यासंबंधी अधिक माहिती अर्जावर आणि वेबसाईटवर तसेच एशियाटिक संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
३) दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर संशोधकीय प्रबंध सादर करायचा आहे.
४) संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व नामवंत परीक्षक
योग्य संशोधकाची /अभ्यासकाची निवड करतील.
● अर्ज कसा मिळवाल आणि कुठे पाठवाल –
https://www.asiaticsociety.org.in/pdf/Application%20Form%202022.pdf या लिंक वरील अर्ज डाऊनलोड करून तो पूर्ण भरून, तुमच्या संशोधन प्रस्तावासह खाली दिलेल्या मेल आयडीवर किंवा एशियाटिक सोसायटीच्या (कार्यालयात) पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकता. (अर्ज वेबसाईट व एशियाटिक सोसायटी,मुंबई कार्यालयातही उपलब्ध आहेत)
● इमेल आयडी – tikekarfellowship@gmail.com
● पत्ता :- टाऊन हॉल, शहीद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र – ४०००२३
● संपर्क क्रमांक :- (कार्यालयीन दूरध्वनी ०२२-२२६६०९५६, २२६६५१३९,
२२६६५५६०)
● वेबसाईट :-www.asiaticsociety.org.in