◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम : रुपये १ लाखापर्यंत प्रतिवर्ष शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीचा तपशील :
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजची १००% शिकवणी फी आणि फी स्ट्रक्चरनुसार देय इतर शुल्काची रक्कम अदा केली जाईल.
कॉलेजचे फी स्ट्रक्चर १ लाखापेक्षा जास्त असेल तर फक्त १ लाख रुपयांपर्यंतच शिष्यवृत्ती मिळेल.
या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप घेण्याकरिता
जास्तीत जास्त ४०,००० रुपये दिले जातील परंतु एकूण शिष्यवृत्ती रक्कम प्रती वर्षी १ लाख रुपयांच्या पेक्षा जास्त मिळणार नाही
◆ पात्रता :
१) महाराष्ट्र, केरळ, गुजरात, आणि तामिळनाडू या राज्यातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे.
३)शहीद सशस्त्र सैन्य दलाच्या कर्मचार्यांच्या मुलांसाठी वार्षिक उत्पन्नाची अट (निकष) लागू होणार नाही.
४) नुकतेच पुढील कोर्सेसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील:- एमबीबीएस, बीएससी नर्सिंग, इंजिनिअरिंग, एमबीए, बीएससी ऍग्रीकल्चर सायन्स, बीएससी कोऑपरेशन आणि बॅंकिंग
◆ आवश्यक कागदपत्र :
१) प्रवेश पत्राची प्रत (ऍडमिशन लेटर)
२) कॉलेजच्या बोनफाईड प्रमाणपत्राची प्रत
३) कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची प्रत
४) बारावीच्या मार्कशीटची (गुणपत्रक) प्रत (जर मुळ मार्कशीट कॉलेज मध्ये जमा केल असेल आणि सत्यापणासाठी (व्हेरिफिकेशन साठी) उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा वेळी कॉलेजच्या प्राचार्यांनी साक्षांकित केलेली गुणपत्रकाची प्रत (झेरॉक्स ) जोडा.
५) सीजीपीए आणि ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी संबंधित विद्यापीठाच्या निर्णयाची प्रत
(एमबीए अर्जदारांसाठी अनिवार्य)
६) महसूल अधिका-यांनी जारी केलेल्या कौटुंबिक उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत
७) जन्म प्रमाणपत्राची प्रत.
८) ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत
९) वैद्यकीय प्रमाणपत्रांची प्रत (शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी )
१०) सशस्त्र सैन्य दलाचे कर्मचारी देशाची सेवा करताना शहीद झाले असल्यास त्यांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता यावा यासाठी त्यासंबंधित पुरावा.
◆ संपर्क :
फेडेरल बँक लिमिटेड, सीएसआर विभाग, चौथा मजला, फेडेरल टॉवर, मरिन ड्राइव्ह, एर्नाकुलम, (केरळ)
फोन: ०४८४२२०१४०१
ईमेल आयडी: csr@federalbank.co.in
◆ वेबसाईट : – www.federalbank.co.in
◆ अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक :- https://www.federalbank.co.in/corporate-social-responsibility