क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

शैक्षणिक गुणवत्ता असूनदेखील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून पदवीच्या १० आणि पदव्युत्तर ५ विद्यार्थ्यांना रक्कम ५०००/- शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येईल.

◆ अर्ज कोण करू शकत:-
१) सदर शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी आहे.
२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न विद्यालय/विद्यापीठाचे विद्यार्थी.

◆ अंतिम तारीख:- १० मार्च २०२१

◆ अर्ज करण्याची पद्धत:-
१) अर्जदाराने अर्ज ऑनलाइन पद्धतीने http://bcud.unipune.ac.in/scholarships/applicant/login.aspx या लिंकवर आवश्यक कागदपत्रासह अपलोड करावीत.
२) विद्यापीठाच्या इतर (सदर शिष्यवृत्ती व्यतिरिक्त) शिष्यवृत्तीपैकी कमाल दोन शिष्यवृत्तीसाठी एक विद्यार्थी अर्ज करू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच दोन शिष्यवृत्तीचे पर्याय निवडावे.

◆ महत्त्वाच्या सूचना:-
१) दिलेल्या मुदतीतच अर्ज करणे अनिवार्य आहे.
२) शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही.
३) विहित केलेल्या कमीकमी गुणांपेक्षा कमी गुण व ATKT असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.
४) सदर शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी आहे.
५) सदर शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्षाच्या केवळ एकाच वर्षासाठी असून २०२०-२१ आधी लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.
६) विद्यार्थ्यांनी दिलेल्या ग्रेड पॉइंटचा उल्लेख न करता टक्केवारीचा उल्लेख करावा.
७) अचुक व परिपूर्ण माहिती आवश्यक.
८) अर्जदार विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे शिवाय ते स्वतःचे असावे. (पालकांचे अथवा नातेवाईकचे खाते विचारात घेतले जाणार नाहीत)

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत.
२) वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला
३) बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत

◆ नियम व अटी-
१) पात्र विद्यार्थिनींस रु. ५०००/- अर्थसहाय्य देण्यात येणार.
२) पालकांचे उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
३) किमान ५० टक्के गुण आवश्यक
४) नियमित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
५) व्यवसायिक अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेतलेला नसावा.
६) शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थिनींनी अर्ज करू नये

संपर्क:- Email:- scholarship@pun.unipune.ac.in

टीप:- कोणत्याही विद्यार्थ्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *