सारथी परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :– अभ्यासक्रमाचे संपूर्ण शुल्क

◆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी, २०२३

◆ पात्र अभ्यासक्रम:-
पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी (कोणत्याही परदेशी भाषेत)
परदेशी भाषा – जर्मन, जपानी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन, पोर्तुगीज व इतर विदेशी भाषा – इंग्रजी वगळून

◆ पात्रता निकष:-
१) विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
२) विद्यार्थी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
३) ज्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात पुढे नमूद केलेल्या कॉलेज किंवा विद्यापीठात परदेशी भाषामध्ये प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याकरिता प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या योजनेकरिता अर्ज करू शकतात.
परदेशी भाषा – जर्मन, जपानी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन, पोर्तुगीज व इतर विदेशी भाषा – इंग्रजी वगळून
४) विद्यार्थ्यांच्या पालकाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा अधिक नसावे.

◆ पात्र कॉलेज आणि विद्यापीठे :-

 1. Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad
 2. Gondwana University, Gadchiroli
 3. Kavayitri Bahinbai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
 4. Mumbai University, Mumbai
 5. The Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur 6. Sant Gadge Baba Amravati University, Amravati.
 6. Savitribai Phule Pune University, Pune.
 7. Shivaji University, Kolhapur
 8. Smt. Nathibai Damodar Thackersey Women’s University, Mumbai
 9. Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University (formerly Solapur
  University), Solapur
 10. Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) रहिवाशी प्रमाणपत्र (Domacile Certificate )
२) शुल्क भरल्याची महाविद्यालयाची फी पावती
३) सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत
४) तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र

◆ Note :-
१) एकाच कुटुंबातील फक्त दोन अपत्यांनाच सदर योजनेचा लाभ घेता येईल
२) विद्यार्थ्याला इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा / स्टायपेंड योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा सध्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा / स्टायपेंड योजनेचा लाभ विद्यार्थी घेत असेल तर असे विद्यार्थी या योजने करीता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
३) सदर योजना गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. व्यवस्थापन कोट्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
४) फक्त नियमित अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्ती करीता अर्ज करू शकतात. बहिस्थ (External Mode) पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

◆ माहिती पुस्तक डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1CgurgR55GE5lmP7m9sK13qhIVuuXPEkX/view?usp=sharing

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwuS7_X_KVp6_AJl0Z4916EUB-qN0JxItSFmbUdHlC-XRCFA/viewform

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- सारथी- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे बालचित्रवाणी, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे ४११००४
ईमेल- sarthipune@gmail.com
दूरध्वनी क्र. 020-25592520
संकेतस्थळ : www.sarthi-maharashtra.gov.in