वाहाणी शिष्यवृत्ती

vahani scholarship

शिष्यवृत्ती रक्कम / फायदे :-

 • अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी संपूर्ण शैक्षणिक फी शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल .
 • प्रवास भत्ता, कॉलेजची पाठ्यपुस्तके, वसतिगृह / पीजी भाडे म्हणून निश्चित स्टायपेंड दिले जाईल.
 • लॅपटॉप खरेदी करण्यासाठी स्टायपेंड दिले जाईल
 • वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास कार्यशाळा
 • प्रयेक विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन
 • काही सर्वोत्तम संस्थांमध्ये समर इंटर्नशिप करण्याची संधी
 • इंग्रजी भाषा कार्यक्रम
 • मानसिक आरोग्य / सायकॉलॉजिकल सपोर्ट

◆ शेवटची तारीख:- १ डिसेंबर २०२२

शिष्यवृत्ती बद्दल:-
वाहाणी शिष्यवृत्ती वाहाणी शिष्यवृत्ती ना-नफा संस्थेद्वारे दिली जाते. 12वीत शिकणारे विद्यार्थी वहानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. वाहाणी शिष्यवृत्ती अंडर-ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांकरिता दिली जाईल.

पात्रता निकष:-
1) सध्या 12वी शिकत असलेले आणि 10वी आणि 11वीच्या परीक्षेत किमान 85% गुण मिळवलेले विद्यार्थी वाहाणी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
२) संपूर्ण भारतातील कोणत्याही महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वाहाणी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
3) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 1.5 लाखांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी वाहाणी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

वाहाणी शिष्यवृत्तीचे टप्पे:-

 • ऑनलाइन अर्ज
 • मुलाखत (फक्त शॉर्ट लिस्ट केलेले उमेदवार)


शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत :- ऑनलाइन

मुलाखतीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे :

 1. मूळ 10वी आणि 11वी मार्कशीट
 2. या वर्षी जारी केलेले मूळ उत्पन्न प्रमाणपत्र
 3. मूळ प्रमाणपत्रे (अर्जदाराने फॉर्ममध्ये नमूद केलेली)
 4. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो

ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1 आई/वडील/पालक स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत
2 लॅपटॉप, कुटुंब, मोबाईल, वाहनाचे चित्र
3 रद्द केलेला चेक, बँक पासबुक
4 तीन निबंध

 • तुम्हाला प्राधान्य असलेल्या संस्थांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम शिकण्यात का रस आहे?
 • तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल लिहा.
 • तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान कोणते होते, आणि तुम्ही ते आव्हान कसे पेलले?
  5 उत्पन्न प्रमाणपत्र

वाहाणी शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न याच्या माहितीकरिता लिंक :-
https://www.vahanischolarship.com/
https://www.vahanischolarship.com/faqs

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://admin.vahanischolarship.in/

संपर्क तपशील:-
पत्ता- C- 20, डिफेन्स कॉलनी, नवी दिल्ली, दिल्ली | 110024
ईमेल- info@vahanischolarship.com
फोन : ९९९९३६१९६९