रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीची रक्कम:-
शिष्यवृत्ती 2 लाखांपर्यंत (शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, लॅपटॉप खरेदी, शैक्षणिक पुस्तके आणि इतर अभ्यासक्रमांसाठी)
सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आणि माजी विद्यार्थ्यांकडून नेटवर्किंग संधीवर वर्कशॉप घेतले जातील

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
१४ फेब्रुवारी २०२३

शिष्यवृत्तीबद्दल:-
रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांना मेरिट-कम-मीन्स आधारावर दिली जाते. शिष्यवृत्ती अनुदानाव्यतिरिक्त, रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिपसाठी आलेल्यांना माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा भाग बनण्याची संधी देते. ज्यामुळे त्यांच्या जीवनावर आणि करिअरच्या मार्गावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण होऊ शकतो. चालू शैक्षणिक वर्षासाठी रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्तीसाठी ५००० पदवीधर विद्वानांची निवड केली जाईल. रिलायन्स फाऊंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिपचे उद्दिष्ट भारतातील तरुणांना सक्षम करणे आणि त्यांना चालना देणे असे आहे.

शिष्यवृत्ती अर्ज आणि निवड प्रक्रिया :-
1] ऑनलाइन अर्ज
2] ॲप्टिट्युड टेस्ट

पात्रता निकष :-
१) जे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. ज्या विद्यार्थांयांना बारावीच्या परीक्षेत किमान ६०% गुण मिळाले आहेत तसेच कोणत्याही विषयात पदवीधर रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्यांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
3) केवळ भारतामध्ये पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

आवश्यक कागदपत्रे:-
1] पासपोर्ट आकाराचे फोटो
2] पत्त्याचा पुरावा
3] दहावी बोर्ड परीक्षेची मार्कशीट
4] बारावी बोर्ड परीक्षेची मार्कशीट
5] सध्याचे महाविद्यालय/नोंदणी संस्थेचे बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र किंवा विद्यार्थी ओळखपत्र
6] कुटुंब उत्पन्नाचा पुरावा
7] अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र

टीप:-
शिष्यवृत्ती अर्जासाठी वयोमर्यादा नाही.
केवळ उच्च माध्यमिक (HSC) १२वी इयत्तेत 60% टक्क्यांहून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
जर विद्यार्थ्यांनी १०वी नंतर डिप्लोमा केला असेल तर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

शिष्यवृत्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंक:-
https://scholarships.reliancefoundation.org/UG_Scholarship.aspx

ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://lnkd.in/dne7ZPwb

“वारंवार विचारले जाणारे प्रश्न” डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:- https://drive.google.com/file/d/1bEmLAOBibLpa3NO5vhDFMA8Yw7SuY6H_/view?usp=sharing

संपर्क:-
ईमेल:- RF.UGScholarships@reliancefoundation.org
व्हॉट्सॲप क्रमांक- 7977 100 100
फोन- 011 41171414