विद्यार्थ्यांना भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावण्यासाठी आणि त्यायोगे आपल्या समाज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवणे हा शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.
◆ अंतिम मुदत: १४ फेब्रुवारी २०२२.
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: –
१) पदवी स्तरासाठी रू. ४ लाखापर्यंत.
२) पदव्युत्तर स्तरासाठी रू. ६ लाखापर्यंत.
शिष्यवृत्ती वैशिष्ट्ये:
१) जागतिक नेते बनण्याची क्षमता असणार्या भारताच्या प्रतिभावान तरूणांचे प्रोत्साहन देणे
२) उत्कृष्ट आणि सर्वात हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्याचा प्रयत्न करत गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाईल.
3) ६० पदवीधर आणि ४० पदव्युत्तर अभ्यासकांची यासाठी निवड केली जाईल
४) प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला ८०% निधी शिकवणी आणि थेट शैक्षणिक खर्चासाठी वापरला दिला जाईल. उर्वरित २०% निधी कॉन्फरन्स संबंधित खर्चासह अप्रत्यक्ष शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासाच्या खर्चासह व्यावसायिक विकासासाठी विनंतीनुसार मंजूर केला जाईल.
५) सर्व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवरील अर्जदारांचे स्वागत करत आणि दिव्यांग उमेदवारांकडील अर्जांना प्रोत्साहन देण्यात येईल. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न १० लाखापेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अतिरिक्त लक्ष देण्यात येईल.
◆ पात्रता निकष: –
१) भारतीय नागरिक आणि भारताचा रहिवासी असावा.
२) शैक्षणिक निकष: –
● पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती: जेईई (मुख्य) पेपर -१ परीक्षेत १-३५,००० मधील रँक मिळवणारे विद्यार्थी*
(* सामान्य रँक यादी)
● पदव्युत्तर शिष्यवृत्ती: ज्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षेमध्ये ५५०-१००० गुण मिळवले किंवा पदवीपूर्व सीजीपीए (७.५ किंवा त्याहून अधिक) किंवा टक्केवारीचे सीजीपीएमध्ये रूपांतर.
कृपया रूपांतरण सूत्र वापरा: सीजीपीए = गुणांची टक्केवारी/ ९.५
◆ महत्वाच्या सूचना:
१) जे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहे आणि त्यांना शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले तर असे विद्यार्थी इतर शिष्यवृत्यांचा सुद्धा लाभ घेऊ शकतात.
२) पदव्युत्तर अभ्यासक्रमा करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर स्त्रोतांकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत असेल तर त्याबद्दल माहिती सादर करणे आवश्यक आहे. तसेच शिष्यवृत्तीच्या कालावधीत इतर स्त्रोतांकडून जास्तीत जास्त १५,००० रुपयांपर्यंतच्या स्टायपेंड घेण्याची विद्यार्थ्यांना परवानगी असेल.
◆ अर्ज आणि निवड प्रक्रिया
१) अर्जाचे घटकः
● वैयक्तिक, शैक्षणिक आणि अतिरिक्त-अभ्यासक्रम तपशील सादर करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर दोन रेफ्ररन्स लेटर सादर करणे आवश्यक आहे: एक म्हणजे आपल्या शैक्षणिक क्षमतेबद्दल( जे कॉलेजच्या प्राध्यापक देऊ शकतात) आणि एक आपल्या चरित्र आणि नेतृत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देणारे.
● दोन निबंध: वैयक्तिक माहितीबद्दल आणि शैक्षणिक ध्येयाबद्दल.
२) शॉर्टलिस्टेड उमेदवारांना व्हर्च्युअल मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
3) विद्यार्थ्यांची निवड जून २०२२ च्या अखेरीस जाहीर केली जाईल
४) कोणत्याही अतिरिक्त प्रश्नांसाठी किंवा समस्येकरिता व्हॉट्सअॅपवर नंबर ७९७७१००१०० वर “Hi” मजकूर पाठवा किंवा RF.Scholarships@reliancefoundation.org या ईमेल आयडीवर आम्हाला ईमेल करा.
◆ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्याच्या वेळापत्रकासाठी:
https://www.scholarships.reliancefoundation.org/
◆ संपर्क: –
ईमेल: – contactus@reliancefoundation.org