ओएनजीसी शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
अभियांत्रिकी, एमबीबीएस, एमबीए आणि मास्टर इन जिओफिजिक्स / जिओलॉजी प्रोग्राममध्ये प्रथम वर्ष शिकत असणाऱ्या एससी / एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी ओएनजीसी शिष्यवृत्ती योजना ही विशेष संधी आहे. निवडलेल्या १००० विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास वार्षिक प्रत्येकी ४८,०००/- रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होईल.

◆ शिष्यवृत्ती रक्कम :- ₹ ४८,०००/-

◆ अर्जाची अंतिम तारीख:- ८ ऑगस्ट २०२१

◆ पात्र कोर्सेस:-
१) अभियांत्रिकी
२) एमबीए
३) एमबीबीएस
४) जिओलॉजि आणि जिओग्राफिक्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण

◆ पात्रता निकष:-
१) उमेदवार पदवी अभियांत्रिकीच्या किंवा एमबीबीएस कोर्सचा किंवा भूशास्त्र / भूभौतिकीशास्त्रच्या पदव्युत्तर किंवा एमबीए या विषयातील पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असावा. शिष्यवृत्ती केवळ एआयसीटीई / एमसीआय / यूजीसी / भारतीय विद्यापीठांची संघटना / राज्य शिक्षण मंडळे / राज्य सरकार / केंद्र सरकारकडून पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
२) अभियांत्रिकी / एमबीबीएस कोर्ससाठी १२ वी मध्ये किमान ६०% आणि भूविज्ञान / जिओफिजिक्स / एमबीएसाठी ६०% गुणांनी पदवी प्राप्त केलेली असावी (टीप: किमान ओजीपीए / सीजीपीए १० गुणांच्या श्रेणीत ६.० असावे)
३) वार्षिक आर्थिक उत्पन्न:- सर्व माध्यमातून मिळणारे उत्पन्न ४.५ लाखाहून अधिक नसावे
४) १ जुलै २०२१ रोजीपर्यंत विद्यार्थ्यांचे वय ३० पेक्षा जास्त नसावे

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) जातीचा दाखला
२) वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला/१०वीची गुणपत्रिका
३) इंजिनिअरिंग/एमबीबीएससाठी १२वीची गुणपत्रिका
४) एमबीए/जिओलॉजि आणि जिओग्राफिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र
५) हिंदी अथवा इंग्रजी माध्यमातून लिहिलेला उत्पन्नाचा दाखला
६) अर्जदाराची ईसीएस फॉर्ममधील बँकेद्वारे विहित केलेल्या पत्त्याची माहिती
७) पॅन कार्डची प्रत
८) आधार कार्डची प्रत
९) मान्यता पत्राची प्रत.

◆ संपर्क तपशील:-
1) पत्ता:-
ओएनजीसी,
8th Floor, Core III, Scope Minar, Laxmi Nagar, Delhi-110092
2) टेलिफोन: 011-22406607 आणि 011-22406708 (कार्यालयीन वेळ १०सकाळ ते ५संध्याकाळ)
3) ई-मेल: scholarship2021@ongcscholar.org 4) सामान्य प्रश्नांसाठी ई-मेल: info@ongcscholar.org

वेबसाईट:- https://ongcscholar.org

◆ अधिक माहितीसाठी लिंक:https://ongcscholar.org/fellowshipScheme

◆ फॉर्म कसा भरावा यासाठी व्हिडीओ :-
1) इंग्रजी- https://youtu.be/4i8tp9VtkAQ
2) हिंदी- https://youtu.be/T7079tvG2fk

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *