● अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०२१
● शिष्यवृत्तीची रक्कम:
केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट रु. 10,000/- प्रति वर्ष 550 विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही शिष्यवृत्ती देते.
● शिष्यवृत्तीविषयी माहिती –
के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने १९९५ मध्ये ‘महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट शिष्यवृत्ती’ द्यायला सुरुवात केली. ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना व ज्यांना भारतातील मान्यताप्राप्त सरकारी पॉलिटेक्निकमध्ये नोकरीभिमुख डिप्लोमा कोर्स करण्याची इच्छा त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शिष्यवृत्ती ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण विद्यार्थ्यांना नोकरीभिमुख डिप्लोमा करण्यासाठी, प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी दिली जाते.
● पात्रता :
१) जे विद्यार्थी शासकीय मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम शिकत आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी /12 वी मध्ये एसएससी /एचएससी किंवा समकक्ष (equivalent ) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी शासकीय किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांमध्ये प्रवेश मिळविला आहे ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
३) ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
४) विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील असावेत. विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी पालकांचे उत्पन्न आणि व्यवसाय दोन्ही विचारात घेतले जातात.
★ कृपया लक्षात घ्या:
१) या शिष्यवृत्तीसाठी मुली, कमी उत्पन्न गटातील मुले, अपंग मुले आणि सशस्त्र दलाच्या जवानांच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.
२) अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे आणि अर्ज सादर करताना विनंती केलेली कागदपत्रे देखील अपलोड करावीत.
३) कृपया आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करा आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी त्याच सॉफ्ट कॉपी तयार ठेवा.
● आवश्यक कागपत्रांची यादी डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : – https://www.kcmet.org/List-of-documents-for-MAITS-2021.pdf
● ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा :- https://mapps.mahindra.com/feedbackform/?id=maits2021
● संपर्क तपशील :
फोन :- +91 22 22895500,
फॅक्स : +91 22 22852441
इमेल :- पी.व्ही.रामचंद्रन RAMCHANDRAN.P2@mahindra.com
किरण रोड्रिग्ज
rodrigues.kieran@mahindra.com
पत्ता
के.सी महिंद्रा एज्युकेशन संस्था,
सेसिल कोर्ट, रिगल सिनेमा जवळ,
महाकवी भूषण मार्ग, मुंबई ४०००१