के सी महिंद्रा शिष्यवृत्ती पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)

१९५६ पासून के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट पात्र विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज शिष्यवृत्ती देते आहे.

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- ३१/३/२०२१

◆ शिष्यवृत्ती रक्कम:-
१) के सी महिंद्रा शिष्यवृत्तीतील प्रथम तीन गुणवंतांना प्रत्येकी आठ (८) लाख रक्कम प्रदान केली जाईल.
२) उर्वरित गुणवंतांना प्रत्येकी चार (४) लाख रुपये कर्ज शिष्यवृत्ती दिली जाईल.

◆ पात्रता :-
१) अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीतील पदवी किंवा तत्सम दर्जाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
२) अर्जदार हे भारतीय असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश निश्चित केला असेल किंवा ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार्‍या अभ्यासक्रमांसाठी नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला असेल केवळ असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
३) फेब्रुवारी २०२२ नंतरच्या अभ्यासक्रमासाठी (परदेशात) अर्ज केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र नसतील.

◆ टीप :-
१) शैक्षणिक वर्ष २०२१ साठी परदेशी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीस अर्ज करायची प्रक्रिया आता सुरू आहे.
२) पदवी अभ्यासक्रम, सेमिनार व परिषदांसाठी परदेशात जाणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र नसतील.

◆ आवश्यक कागदपत्रे :-
१) प्रवेश पत्रांची एक प्रत आवश्यक आहे. उदाहरण :- कृपया लक्षात घ्या की आपल्याला अद्याप प्रवेशपत्र प्राप्त झाले नसल्यास आपण एक वर्ड फाईल अपलोड करू शकता. ज्यात आपण प्रवेशासाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप प्रवेश पत्र / ईमेल प्राप्त झाले नाही. (असा मजकूर तुम्ही अर्ज केलेल्या विद्यापीठातून मागून घ्यावा.)
२) तुमची शिफारस करणाऱ्या व्यक्तीने स्वाक्षरी केलेले शिफारस पत्र द्यावे. हे पत्र कंपनी/संस्थेच्या अधिकृत लेटरहेडवर असले पाहिजे. आपण संबंधित
संस्था किंवा कंपनीचे पत्र मिळविण्यात अक्षम असल्यास संस्था / कंपनी, नंतर शिफारसपत्र ईमेल वर पाठवू शकते. आपल्याला शिफारस करणारी व्यक्ती तिच्या / त्याच्या अधिकृत ईमेल आयडी वरून rodrigues.kieran@mahindra.com या ईमेल वर मेल पाठवू शकते.
३) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने त्याची जनरल ॲप्टिट्युड (सामान्य योग्यता), आवड, तसेच आपल्याला कोणता व्ययसाय करायचा आहे, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वकांक्षा कोणत्या याबाबतीत विधान करणाऱ्या काही ओळी लिहून पाठवायच्या आहेत.
४) जीआरई आणि जीमॅट परीक्षेच्या मार्कांची प्रत (आपल्याला लागू होत असल्यास)
५) IELTS/TOEFL या परीक्षांचे गुणांची प्रत (if applicable)
६) अभ्यासक्रमाचा पुरावा म्हणून आणि पदवी प्रमाणपत्र मार्कशीट सोबत जोडणे आवश्यक आहे.
७) रँक सर्टिफिकेट (if applicable)
८) दहावी आणि १२ वी गुणपत्रक आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
९) वयाचा पुरावा (सेल्फ अटेस्टेड प्रत)
१०) आपला नजीकच्या काळात तयार केलेला C. V.

◆ संपर्काचा तपशील :-
संपर्क व्यक्ती :- श्री.किरण रोड्रिग्ज
ईमेल :- rodrigues.kieran@mahindra.com
फोन :- (022) 6897 5526

◆ वेबसाईट : – https://www.kcmet.org/what-we-do-Scholarship-Grants.aspx

◆ अर्ज करण्यासाठी लिंक :-
http://mahindraapps.com:8080/feedbackform/?id=KCMET_2021

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *