● महाराष्ट्र शासन परदेशी शिक्षणाकरिता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ●

● शिष्यवृत्ती बद्दल:-
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२१-२०२२ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

● शिष्यवृत्तीच्या अटी व शर्ती:-
१) विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२) विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ६ लाखापेक्षा जास्त नसावे.
३) जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० विद्यापीठामध्ये व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा अट लागू नाही.
४) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.
५) परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती मिळणार नाही.
६) परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम करण्यास परवानगी राहील.
७) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणार असेल त्या विद्यापीठास व अभ्यासक्रमास भारतीय आयुविज्ञान परिषदेची (ICMR) मान्यता असणे आवश्यक आहे..
८) परदेशातील ज्या शिक्षण संस्था किंवा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांची जागतीक क्रमवारी ( World University Rank) ३०० च्या आत असावी.
९) यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्तीअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे, असे विद्यार्थी देखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

● शिष्यवृत्तीचे लाभ :-
१) विद्यापीठाची शिक्षण फी पूर्ण रक्कम तसेच शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती (National Overseas Scholarship) योजनेअंतर्गत लागू करण्यात आलेली इतर फी (अ) आरोग्य विमा आणि (ब) व्हिसा शुल्क शिष्यवृत्तीधारकांना मिळेल.
२) विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह निधी अमेरिकेसाठी यु.एस. डॉलर १५,४०० तर इंग्लंडसाठी जी.बी. पौड ९९०० इतका देण्यात येईल. विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि नजीकच्या मर्गाचा इकॉनॉमी क्लास विमान प्रवासाचा खर्च दिला जाईल.
३) विद्यार्थ्यांना आकस्मिक खर्चासाठी संयुक्त राष्ट्र व इतर देशांसाठी यु.एस. डॉलर १५०० तर इंग्लंडसाठी जी.बी. पॉड १,१०० इतकी रक्कम देण्यात येईल. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

अर्ज करण्याची पद्धत:-
https://www.maharashtra.gov.in/1143/Careers या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक १४/०६/२०२२ पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत swfs.applications.2122@gmail.com या ई-मेलवर पाठवून त्याची हार्डकॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३. चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करावा.

महत्वाचे:-
कोविड १९ या सांसर्गिक रोगाचा जगभरात झालेला प्रादुर्भाव लक्षात घेता कोणतेही कारण न देता सदर योजनेची जाहिरात रद्द करणे, निवड/प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलणे यासह योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे सर्व अधिकार शासन स्वतःकडे राखून ठेवत आहे. तसेच नजिकच्या काळात योजनेअंतर्गत पालकांच्या कुटुंबाच्या उत्पन्न मर्यादेत तसेच जागांमध्ये वाढ झाल्यास त्यानुसार जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे / सुधारणा करण्याचे व फेरअर्ज मागविण्याचे अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी. www.maharashtra.gov.in येथे रोजगार या लिंकवर क्लिक करा.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. :
(i) विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज.
(i) सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र.
(ii) सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
(iv) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे. (सनद / मार्क लिस्ट).
(v) परदेशातील क्यू.एस जागतिक मानांकन ३०० पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विना अट ऑफर लेटर.
(vi) ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रकाची प्रत.
(vi) आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे.
(vii) दोन भारतीय नागरीकांचे जामीनपत्र.
(ix) दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र.
(x) संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्ष निहाय आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क पाठयपुस्तके,स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च, येण्या-जाण्याचा विमान प्रवास याचा समावेश असावा.

● संपर्क तपशील:-
१) पत्ता: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे-४११००१
2) ई-मेल-fs.directorsw@gmail.com
3) दूरध्वनी क्र. ०२०-२६१२७५६९/२६१३७९८६

2 thoughts on “● महाराष्ट्र शासन परदेशी शिक्षणाकरिता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ●”

 1. Pranshu Sunil Shende

  Dear Sir/ Madam,

  Is there any possibilities that the Rajarshi Shahu Maharaj scholarship scheme 22-23 for special study abroad for SC girls and boys will get date extension.
  Will there be an date extension for the application.
  Can you please help?

  1. Dear Student,

   Currently Team maxima have no any information Regarding last date extension of Rajarshi Shahu Maharaj scholarship.
   Last Date is 22nd june 2022

   Thanks & Regards,
   Team Maxima

Comments are closed.