कमिन्स नर्चरिंग ब्रिलियन्स शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-
– कॉलेजचे संपूर्ण प्रवेश आणि शिक्षण शुल्क
– विद्यापीठ शुल्क,
– डेव्हलपमेन्ट फी आणि परीक्षा शुल्क
– अभियांत्रिकी पदवी (बीई / बी टेक ) विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप
– कमिन्स कंपनीतील वरिष्ठ कर्मचार्यांचे मार्गदर्शन मिळवण्याची संधी
– रोजगारक्षमता सुधारण्यासाठी ई-लर्निंग सॉफ्टस्किल मॉड्यूल
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रमाचे नाव:
इंजिनीअरींग (कोणतीही शाखा)
डिप्लोमा (कोणतीही शाखा)
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
2006 मध्ये, कमिन्स इंडिया फाउंडेशन (CIF) ने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इंजिनीअरींग आणि डिप्लोमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कमिन्स शिष्यवृत्ती’ सुरू केली आहे. आजपर्यंत, कमिन्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत १७३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. कमिन्स शिष्यवृत्तीकरिता निवडलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीत कमिन्स कंपनीमधील वरिष्ठ कर्मचारी मार्गदर्शन करतात.
◆पात्रतेचे निकष:-
१) सध्या इंजिनीअरिंगच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात किंवा डिप्लोमाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले आणि १०वी आणि १२वी परीक्षेत किमान ६०% मिळवलेले विद्यार्थी कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) मागील सर्व परीक्षांमध्ये किमान ६०% गुण मिळवलेले विद्यार्थी कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. (इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या किंवा तिसर्या वर्षात किंवा डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी)
३) फक्त अहमदनगर, इंदूर (पिथमपूर आणि देवास), जमशेदपूर, फलटण आणि पुणे येथे आणि आसपास असणाऱ्या महाविद्यालयांत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थी कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
1 ऑनलाइन अर्ज
2 Aptitude टेस्ट
3 वैयक्तिक मुलाखत
◆ टीप :-
• कमिन्स शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याकरीता विद्यार्थ्यांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
• कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अभियांत्रिकी किंवा डिप्लोमाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
• कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता विद्यार्थ्यांचे सर्व स्त्रोतांकडून मिळणारे एकूण कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ₹ ३ लाख (तीन लाख) रुपयांपेक्षा जास्त नसावे.
• इंजिनीअरिंगच्या / डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी कमिन्स शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
• अर्जदाराच्या कुटुंबातील अगोदर कोणीही शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असल्यास असे विद्यार्थी कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत .
• विद्यार्थी डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंगसाठी कमिन्स शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. पण डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंग दोन्हीसाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाहीत .
• कमिन्स शिष्यवृत्तीअंतर्गत पुढे नमूद केलेले शुल्क दिले जात नाही. खाजगी शिकवणी फी, निवास खर्च, वसतिगृह, मेस, वाहतूक, बस खर्च , कॅन्टीन किंवा कॅफेटेरियाचे शुल्क , Refundable/ Non-refundable Deposits, Caution money Deposits
◆संपर्क तपशील:-
ईमेल:- indiacr@cummins.com
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://nurturingbrilliance.org/
◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-
◆ शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी? (अॅप्लिकेशन मॅन्युअल डाउनलोड करा) :-