● सशक्त शिष्यवृत्ती ही संपूर्ण भारतातील विद्यार्थिनींना विज्ञान शाखेत उत्तुंग करिअर करण्यासाठी व पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येणारा एक प्रकारचा उपक्रम आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यींनींना, विशेषत: ग्रामीण भारत आणि निम्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या मुलींना, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन करून भारतातील काही उत्कृष्ट विज्ञान संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते.
● शिष्यवृतीचे फायदे :-
१) ही शिष्यवृत्ती विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना तीनही वर्ष अर्थसहाय्य देते.
२) शिष्यवृत्तीत तीन वर्षांच्या अभ्यासासाठी २,४०,००० रुपये (८०,००० /प्रतिवर्ष) आहे, ज्यात महाविद्यालयीन शिक्षण शुल्क, अभ्यासाचा खर्च आणि मूलभूत जीवन खर्च यांचा समावेश होतो.
३) मार्गदर्शक म्हणून आघाडीच्या महिला वैज्ञानिक, विद्वानांना (स्कॉलर्सना) त्यांच्या शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात मार्गदर्शन करतात.
- पात्रता निकष:-
१) ज्या विद्यार्थ्यींनींची शैक्षणिक वर्षांतील नोंद उत्कृष्ट आहे आणि ज्या विद्यार्थिनींना देशातील उत्तम विज्ञान कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यींनी बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यावर लगेच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
२) केवळ जे विद्यार्थी त्यांच्या पदवीसाठी शुद्ध / नैसर्गिक विज्ञान अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यास निवड करतात तेच या शिष्यवृत्तीस पात्र आहेत.
३) ग्रामीण पार्श्वभूमी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी आणि वैज्ञानिक संशोधनात रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
महत्त्वपूर्ण: सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशाची पुष्टी केलेल्या विद्यार्थ्यींनींना शिष्यवृत्ती दिली जाईल.
● पुढील संस्थामधील विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती मिळेल :-
मुंबई :- १) मिठीबाई कॉलेज, २) सोफिया कॉलेज (मुलींसाठी)
कलकत्ता :- १) सेंट झेविअर्स कॉलेज २) लॉरेटो कॉलेज
हैद्राबाद :- १) सेंट फ्रान्सिस मुलींचे डिग्री कॉलेज २) लोयोला अकॅडमी
दिल्ली :- १) मिरांडा हाऊस हिंदू कॉलेज २) सेंट स्टीफन कॉलेज ३) श्री वेंकेटेश्वरा कॉलेज ४) हंसराज कॉलेज ५) एआरएसडीसी गार्गी कॉलेज
चेन्नई :- १) मद्रास ख्रिश्चन कॉलेज २) स्टेला मॅरेज कॉलेज ३) प्रेसिडेन्सी कॉलेज ४) लोयोला कॉलेज
बँगलोर :- १) डिपार्टमेंट ऑफ सायन्स ख्रिस्त माउंट कार्मेल कॉलेज २) सेंट जोसेफ कॉलेज
● आवश्यक कागदपत्रे :-
१) दहावी प्रमाणपत्र (अनिवार्य)
२) दहावीचे गुणपत्रक (वैकल्पिक)
३) बारावी/ १० + २ गुणपत्रक (अनिवार्य)
४) बारावी/ १० + २ प्रमाणपत्र (वैकल्पिक)
५) ५ लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्नासाठी मिळकत प्रमाणपत्र अनिवार्य
६) पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र अनिवार्य
● अर्ज प्रक्रिया :-
१) नोंदणी करा
२) अर्ज भरा आणि कागदपत्रे सबमिट करा
३) संस्था निवडा
४) ऍडमिशन ऑफर कोणत्याही संस्थेत ३१ ऑगस्ट २०२१ आधी सबमिट करा.
५) निवड पुष्टीकरण ईमेलची प्रतीक्षा करा
- वेबसाइट:- www.drreddysfoundation.org
(अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्यावी)
- संपर्क :-
डॉ रेड्डीज फाउंडेशन
६-३-६५५ / १२, सोमाजीगुडा, हैदराबाद-५०००८२.
फोन:- 04023304199/1868
फॅक्स:- + 91-40-23301085
ईमेल:- info@sashaktscholarship.org